सदस्य नोंदणी

[arm_setup id=”1″ logged_in_message=”You are already logged in.”]

शिलेदाराची प्रतिज्ञा

मी मराठी एकीकरण समितीचा शिलेदार, माझ्या जन्मदात्या आई-वडीलांची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो कि, माझ्या ‘मराठी’ भाषेला व महाराष्ट्र संस्कृतीला इतरांच्या अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी व तिला राजवैभव प्राप्त करुन देण्यासाठी यावज्जीव काया-वाचा-मनाने झटेन. 

माझ्या राज्यभाषेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. या कामी देहाचा होम करावा लागला तरी मी फिरुन याच महाराष्ट्रात पुन्हा-पुन्हा जन्म घेईन. माझे अपुरे राहीलेले काम पुर्ण करण्यासाठी माझे आराध्यदैवत मला जरुर ती बुद्धी, युक्ती, शक्ती व स्फुर्ती देवो !

जय महाराष्ट्र !! जय मराठी !!!

नियम व अटी

१)  संघटनेचे प्राथमिक सदस्यत्व केवळ मराठी भाषिकांना दिले जाईल. (मराठी भाषिक मुसलमान सुद्धा) 
२)  संघटनेच्या कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप करू दिला जाणार नाही. 
३) संघटनेच्या पाधाधिकार्यारस राजकीय निवडणूक लढवायची असल्यास पदाचा राजीनामा द्यावा लागेल. व राजकीय पक्षातील पदाधिकारी यांना संघटनेचे पदाधिकारी होता येणार नाही, मार्गदर्शक म्हणून नेमणूक होईल. 
४)संघटनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही मुलाखत अथवा पत्रकारांशी संपर्क करू नये.  
५)  सदस्याने संघटनेच्या नावाने कोणतीही गैरकाम, गैरव्यवहार करू नये,.

प्रमुख मागण्या

१) मुंबई, पुणे, ठाणे आणि महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात बांधकाम झालेल्या इमारतीत ३५ % बाजारभावपेक्षा कमी दराने राहण्याच्या सदनिका (घरे) व व्यापारी गाळे, व्यापारी संकुलात आग्रहक्काने कायदेशीरदृष्ट्या प्राधान्याने मराठी माणसांनाच मिळाल्या पाहिजेत ही कायद्यात तरतूद करावी. 
 
२) पालघर जिल्ह्यासह निर्माण होणार्या तिसर्याे मुंबईत मराठी माणसाला नोकरी, व्यवसाय,वास्तव्य, बांधकाम, ठेकेदारी, यामध्ये ९०% आग्रहक्क देण्यात यावा.
३) मराठी भाषा ही अधिकृत व्यवहाराची भाषा करून खाजगी क्षेत्र, न्यायालय, शाळा, महाविध्यालय सर्व ठिकाणी अनिवार्य करून मराठी भाषा सक्तीची झालीच पाहिजे. (नोकरी करण्यास येणार्याकना १०० गुणाची मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण असावे हा कायदा अमलात आणावा)