मराठी भाषा, राज्य, संस्कृतीचे संवर्धन, मराठी शिक्षण व्यवस्था, मराठी अर्थकारण, उद्योजक व अर्थकारण या ध्येयाने एकवटलेले मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) हे एक महाराष्ट्र राज्यातील बिगराजकीय संघटन आहे.

सदस्यत्व घ्या

समितीबद्दल थोडक्यात

मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) हे एक महाराष्ट्र राज्यातील बिगराजकीय संघटन आहे. ही लोकचळवळ मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषा, मराठी माध्यमातील शिक्षण, स्थानिक मराठी माणसांचा रोजगार यासाठी ६ जून २०१५ पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे.

          संघटनेचे मूळ ध्येय मराठी माणसांना एकत्र आणून उद्योग क्षेत्रात मराठी माणसाची मोठी फळी उभारावी हे आहे. राज्यात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपी विरोधात आवाज उचलण्यासाठी कायदेशीर लढा देणे, आंदोलने करणे, मराठी हा विषय राजकारणापुरता नसून राजकारणाचा वापर मराठी संवर्धनसाठी केला पाहिजे हे संघटनेचे धोरण आहे. ही संघटना सर्व राजकीय पक्षांना, राज्यातील जनतेला मराठी भाषेविषयी, मराठी शाळांविषयी जागरूक करण्याचे काम करत आहे. या महाराष्ट्रात धर्म, जात, राजकीय पक्ष बाजूला ठेऊन मराठीसाठी कार्य करणारी ही बिगराजकीय संघटना आहे. मराठी एकीकरण समिती संघटनेची सध्या २२,००० हून जास्त सभासद प्रामुख्याने मुख्य शहरात आहेत.

          संघटनेचे मार्गदर्शक माजी आय एफ एस अधिकारी, माजी पोलिस अधिकारी, काही कायदेतज्ज्ञ तसेच सामाजिक क्षेत्रातील काही मोठी नेते मंडळी आहेत.


लोकचळवळीस आर्थिक आधार द्या

मराठी एकीकरण समिती फोरम

हि समितीची लोक संपर्काचे व्यासपीठ असून मराठी लोकांचे सशक्त पाठबळ मिळावे आणि एकीच्या बळाने स्वराज्य अबाधित ठेण्यासाठीचा प्रयत्न आहे. या प्रणालीवर समितीचे अधिकृत सदस्यत्व मिळत नाही. या प्रणालीवर समिती समर्थकांचे आणि सर्व मराठी भाषिकांचे संघटन व्हावे यासाठी नोंदणी होते. समिती मध्ये शिलेदार होण्यासाठी खाली पर्याय उपलब्ध आहे. आपले मराठी एकीकरण फोरम मध्ये सहर्ष स्वागत.


सामील व्हा

II मराठी एकीकरण समिती कार्य II

II समिती सामाजिक माध्यमे II

Tweets by @ekikaranmarathi

संपर्क

  • फोन : +९१९८९२८५१३४२ , +९१८८९८२२०१११
  • ईमेल पत्ता : marathiekikaransamitee@gmail.com

मुख्य कार्यालय

मोघे निवास ,संयुक्त महाराष्ट्र दालन समोर, छत्रपती शिवाजी महाराज दालन , दादर पश्चिम ,मुंबई 400028

पत्र व्यवहार कार्यालय संपर्क

कार्यालय क्र. ७-८ / बी-१५ , सेक्टर ७ , अमरछाया शांतीनगर, मीरा रोड (पूर्व) जि. ठाणे ४०११०७ (महाराष्ट्र)